अकोला : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2021-22 या वर्षात मंजुर निधीतून पारधी समाजाच्या विकासासाठी योजना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत पारधी समाजाच्या युवक युवतींना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसह लायसन्स देण्यात येणार असून त्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पारधी समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनामध्ये पारधी/फासेपारधी समाजाच्या जमाती कडून दि. 16 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. या पारधी समाजातील युवक/युवतींना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षणासह लायसन्स देणे(30 दिवस व अनिवासी), लाभार्थी संख्या 70 राहिल. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत किमान नववी पास असावा. पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवास विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अकोला यांनी केले.