अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : डॉ.एच. एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इतिहास विभागाच्या वतीने वीरगाथा पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उदघाटन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. गुलाबरावजी ताले पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व फीत कापून करण्यात आले. यावेळी श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे आजीवन सदस्य तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. अशोकसिंह रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस.खंडारे, पोस्टर प्रदर्शनीचे समन्वयक इतिहास विभागप्रमुख डॉ. व्ही जी वसू , सहसमन्वयक प्रा.अरविंद भोंगळे, स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष श्री. राजेश ताले उपस्थित होते. प्रदर्शनीचे उदघाटक श्री. गुलाबरावजी ताले पाटील प्रदर्शनी बद्दल भावना व्यक्त करताना म्हणाले की,स्वातंत्र्यवीरांच्या आठवणी चित्राच्या माध्यमातून जिवंतपणे साकारणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव तर देतेच त्यासोबतच भारतीय इतिहासाच्या गौरवशाली परंपरेला वृद्धिंगत करण्याची प्रेरणा देते. यावेळी मान्यवरांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. एस.खंडारे, आणि “वीरगाथा पोस्टर “प्रदर्शनीचे समन्वयक डॉ. व्ही.जी.वसु यांचे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अभिनंदन केले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.अनिल देशमुख व डॉ. संजय खांदेल यांनी केले.या स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक स्पर्धकांपैकी तीन स्पर्धकांना उत्कृष्ट पोस्टर रेखाटणासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम क्रमांक आशिष इंगोले,द्वितीय क्रमांक अविनाश पोहरे, तृतीय क्रमांक स्नेहल खंडारे यांना प्रदान करण्यात आले. स्पर्धेकरिता प्रा. रवींद्र तायडे व प्रा. शिवकुमार बायस यांनी मदत केली.


