शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : जम्मु काश्मिरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी(दि.8) मोठ्या ढगफुटीमुळे यात्रेकरी वाहुन गेल्याची माहीती मिळाली. या घटनेमध्ये सद्यास्थितीत जिल्ह्यातील कोणीही प्रवाशी नसल्याबाबत खात्री करण्यात आली आहे.अकोला जिल्ह्यातील अकोट शहर, पणज व हिवरखेड येथील एकूण 29 प्रवाशी अमरनाथ येथे दर्शनाकरीता गेलेले असुन सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. प्रवाशी रामबन जिल्ह्यातील चंद्रकोट या ठिकाणी सी.आर.पी.एफ.च्या कॅम्प जवळ असलेल्या यात्री निवासामध्ये सुखरुप आहेत. जिल्हा प्रशासनाचे वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अमरनाथ येथे गेलेल्या 29 प्रवाशाच्या पथकातील योगेश वाकोडे, मनिष डांबरे यांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधला असुन 29 प्रवाशी सुरक्षित असल्याबाबत खात्री करण्यात आली आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील अमरनाथ यात्रा ग्रुप मधील सदस्य सुध्दा अमरनाथ दर्शनासाठी गेलेले प्रवाशी सुखरुप आहेत. या ग्रुपमधील शरद भेंडे यांचेशी सपंर्क साधून त्यांचेसोबत असलेले 18 प्रवाशी सुखरुप आहे. अशाप्रकारे अकोला जिल्ह्यातील 47 प्रवाशी सुरक्षित असल्याबाबत जिल्हा प्रशासनाव्दारे खात्री केली आहे. अमरनाथ यात्रेच्या अनुषंगाने एन.डी.आर.एफ. हेल्पलाईन 011-2343852 व 011-23438253, काश्मिर डिव्हीजनल हेल्पलाईन 0194-2496240 क्रमांक जारी केले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर कोणी प्रवाशी अमरनाथ यात्रेला गेले असल्यास त्यांचे नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी सपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.











