अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था – बार्टी पुणे ह्यांचे मार्फत सामाजिक न्याय विभाग ह्यांच्या मार्फत तसेच सामाजिक न्याय मंत्री मा. ना. धनंजय मुंढे साहेबांच्या संकल्पनेतून व विधान परिषद आमदार अमोल मिटकरी ह्यांच्या पुढाकाराने त्यांच्या निधीतून संपूर्ण राज्यभर छत्रपती शाहू महाराजांचे कार्य शेवटच्या घटका पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने चित्र प्रदर्शनीचे आयोजन श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात करण्यात आले होते. ह्या प्रदर्शनीचे उदघाट्न महाविद्यालयाचे अध्यक्ष मा कृष्णाभाऊ अंधारे ह्यांच्या हस्ते पार पडले. ह्या प्रसंगी प्रकल्प संचालक विजय बेदरकर, प्राचार्य डॉ राम खर्डे, ह्यांच्या सह बार्टीचे मनीष चोटमल, निलेश गाडगे, समता तायडे, वैशाली गवई, स्मिता गवई ह्यांच्यासह महाविद्यालयाचे प्रा. रोहित कनोजे, प्रा. पंकज देशमुख, प्रा. गोपाल बेद्रे, प्रा. शैलेश दवने, प्रा. सौरभ वर्मा,प्रा. राधेश्याम डाखोरे, प्रा गायकवाड मॅडम, प्रा. पोरे मॅडम, प्रा राऊत मॅडम, प्रा खवणे मॅडम, प्रा पंचंबुध्ये मॅडम, प्रा. पण्हेरकर मॅडम, प्रा वानखडे मॅडम, ह्यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी, विद्यार्थिनी ह्यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.ह्या प्रसंगी बोलताना मा.कृष्णा अंधारे ह्यांनी म्हटले की राजर्षी शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य केल आहे. आरक्षण, शेती, महसूल, नियोजन, सामाजिक दुरी दूर करून स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवण्या साठी मोलाचं कार्य केल. त्यांच कार्य राज्यातील शेवटच्या घटका पर्यन्त पोचविन्या साठी हा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल असं मत व्यक्त केल.आमदार अमोल मिटकरी ह्यांच्या माध्यमातून हे कार्य राज्यभर पुढे नेल्या जाईल. ह्या प्रसंगी आलेल्या समता रथाचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. बेद्रे ह्यांनी तरी आभार प्रदर्शन समता तायडे ह्यांनी केले. सर्व विध्यार्थी व विध्यार्थीनीं व कर्मचारी ह्यांनी शाहू महाराजां विषयीच्या चित्र प्रदर्शनी पाहुन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.











