अकोला : सामाजीक न्याय विभागांतर्गत असलेले बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे प्रवेश सुरु झाले आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वर्ग आठवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेत असलेले तसेच बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणे वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरू आहे. वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची, नास्ता व जेवणाची मोफत सुविधा पुरविण्यात येईल. तसेच स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, मासीक निर्वाह भत्ता व अभ्यासकरीता सोईसुविधा दिल्या जाईल. वसतीगृहात ऑफलाईन प्रवेशासाठी शालेय विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. 15 जुलैपर्यंत, इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. 30 जुलैपर्यत तर बारावी नंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखाच्या पदवी व पदवीयुत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 24 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे. अधिक माहितीकरीता मो.न. 8308058833 संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त व बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल के. एम. तिडके यांनी केले.