किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : मागच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीने आगिखेड येथील कांताबाई तवंर या निराधार विधवा महिलेचं राहत घर कोसळलं होतं ही वार्ता सोशल मीडिया वर वा-यासारखी पसरली होती त्याची दखल घेत पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठा.शिवकुमारसिंह बायस यांनी उघड्यावर आलेल्या निराधार विधवा महिलेच्या कुटूंबाला आशेचा एक नवा किरण दाखवत पुण्यातील राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर या संस्थेच्या आर्थिक मदतीच्या जोरावर अडीच लाख रूपये खर्चून त्यांच्या स्वप्नातील घराच्या निर्मितीला सुरवात केली. आर्किटेक कडून घराचा नकाशा बनवला तो ग्रामपंचायत कडे सादर करून शासनाच्या नियमानुसार बांधकामासाठी लागणारी आवश्यक परवानगी घेवून घरकुलाच्या पायाभरणीला सरपंच,उपसरपंच व स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते पुजन करून सुरवात केल्या गेली.घराचे संम्पुर्ण बांधकाम हे आर सी सी असून संडास बाथरुम सह दोन मोठ्या खोल्या आहेत.आत्तापर्यंत घराचे ऐंशी टक्के काम उत्कृष्ट दर्जाचे झालेले असून संघटनेनी दिलेला अडीच लाखांचा निधी संपल्याने उर्वरीत राहीलेले बांधकाम पुर्ण करण्यासाठी जवळपास आणखी एक ते दिड लाख रुपयांची आवश्यकता भासत आहे.अनेकांना मदतीसाठी विकास मंचाने साकडे घातले परंतु अद्याप पर्यंत कोणीही सामाजिक अथवा राजकीय पुढाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. बांधकाम सुरू असतांनाच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलासाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करून सरपंच व ग्रामसेवक यांच्या अनमोल सहकार्याने व त्यांच्या कडे वेळोवेळी योग्य पाठपुरावा करून या निराधार विधवा महिलेचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणारे घरकुल मंजूर करण्यात आले परंतु मागील पाच महिन्यांपासून सारखा पाठपुरावा करूनही याचा निधी लाभार्थी ला मिळत नाही.पातुर तालुका विकास मंचाने शासन दरबारी तसेच या भागाचे स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले आमदार नितीन देशमुख यांच्या कडे याबाबत वारंवार पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला पण त्यावर शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोणीच आपले म्हणने ऐकून घेत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर ही बाब ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या लक्षात आणून दिली.त्यांनी याबाबत त्वरित माहिती घेतली व दफ्तर दिरंगाई करणा-या ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही केली तरीही हा प्रश्न येथे सुटला नाही म्हणून पातुर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना विकास मंचाने निवेदन देवून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.गट विकास अधिकारी यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत आगिखेडला सण २०२१-२०२२ ला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस मध्ये इतरचा लक्षांक ५ असून इतरच्या लक्षांक मध्ये आणखी वाढ करून तो १० देण्यात यावा अशी विनंती प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अकोला जिल्हा यांना त्यांच्या पत्राद्वारे केली आहे.यावर प्रकल्प संचालक काय निर्णय घेतात यावर पातुर तालुका विकास मंचाचे लक्ष लागले आहे. एकंदरीत सर्व सामान्य कुटुंबातील निराधार भूमिपुत्रांचा वाली या जगात कोणीही नसतो जोपर्यंत त्यांना समाजातील चांगल्या नागरिकांची साथ मिळत नाही.आगिखेडच्या निराधार विधवा महिला श्रीमती कांताबाई तवंर आजही आपला संसार उघड्यावर मांडून आपल्या स्वप्नातील घराचं स्वप्न रोज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.पावसाळ्यापुर्वी त्यांना आपल्या कुटूंबासह हक्काच्या घरात नेण्यासाठी समाजातील आणखी कोन धावून येते व माणुसकीचे दर्शन देते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. पातुर तालुका विकास मंच व राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर या संस्थांनी केलेल्या पायपीटला कधी यश संपादन होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.