किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजुला आठवडी बाजारामधील पोळा सन होणाऱ्या ठिकाणी न.प. पातुर मार्फत सुरू असलेल्या भिंत आवाराचे बांधकाम त्वरीत बंद करण्यात यावे, पातूर शहरातील नागरिकांनी दिले न प प्रशासकाला निवेदन न. प. च्या खोडसाळपणा विरुद्ध रहिवासी नागरिक रस्त्यावर,वाद चिघळण्याचे संकेत पातुर येथील वार्ड ९, १०, ११ मधील समस्त नागरीक यांनी नगर परिषद प्रशासक यांना तक्रार अर्ज दिला, त्या नुसार पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजुला आठवडी बाजारामधील पोळा सन होणाऱ्या वादग्रस्त ठिकाणी न.प. पातुर मार्फत दलितोत्तर योजनेमार्फत सुरू असलेल्या भिंत आवाराचे बांधकाम चालू केले आहे सदरहू बांधकाम असलेली जागा हि हिन्दु धार्मीक सन उत्सव साजरी करणारे एक पवित्र ठिकाण असून या ठिकाणी सार्वजनिक पोळा सन साजरा होते, त्याचप्रमाणे बाजुलाच असलेले त्रिगुणा मातेचे मंदीर असून त्या ठिकाणी नवरात्रामध्ये दहा दिवस नवरात्रोत्सव चालतो. तसेच विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेल्या दसरा सनाला दरवर्षी प्रमाणे भवानी देवीची पोत मिरवणुक जेव्हा त्रिगुणा मातेच्या भेटला येते तेव्हा याच जागेवर मोठा संखेने उत्सव साजरा होतो आणि हिच मिरवणुक समोर जात असतांना असंख्य नागरीक स्वागतासाठी याठीकाणी उपस्थितीत असतात व याच जागेवर मकर सक्रातीला गाय पंगत पुजनाचा कार्यक्रम पार पडतो, व हि जागा नेहमीसाठी गाय पंगत पुजन या कार्यक्रमाला कायम ठेवण्यात यावी. तसेच गावातील सार्वजनिक मिरवणुका जसे की, गणपती मिरवणुक, दुर्गा देवी मिरवणुक, कावड यात्रा, छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक इ. सार्वजनिक कार्यकम है या लगत असलेल्या रस्त्यावरून जातात. तसेच पातुर शहरात दर शनिवारी भरणान्या आठवडी बाजाराकरीता व्यवसायीकांना त्याचे प्रतिष्ठाने लावण्याकरीता जागा अपुरी पडत आहे. व्यवसायीकांना त्यांचे प्रतिष्ठाने लावता येणार नाही व त्यांचेवर उपासमारीची पाळी येवु शकते. तसेच या आधी शाळेमध्ये जाणान्या विद्यार्थ्याच्या व सरकारी दवाखान्याच्या मुद्दयावर याच जागेला लागुन असलेल्या रस्त्यासंबंधी फार मोठा वाद उद्भवला होता. भविष्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दवाखान्यातील रूग्नवाहिकेला अडथळा निर्माण होवु नये व व्यवसायीकांना त्यांचे प्रतिष्ठाने गोंदणी ग्राउंडमध्ये स्थालातरीत करण्यात आले. तसेच हा निर्माणाधिण आधीच अरूंद असलेला मुख्य मिरवणुकीचा रस्ता भिंत आवारामुळे आणखी अडचणीचा व त्रासदायक होवुन तेथे भविष्यामध्ये धार्मिक वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच वेळोवेळी नगर परिषद प्रशासन संबंधीत या जागेवर जाणुन बुजून हिंन्दु धर्मीयांच्या धार्मीक भावनेला दुखवुन ठेच पोहविण्याचे काम करत आहेत. तसेच सदरहु बांधकाम दलितोत्तर योजनेतुन होत आहे असे समजले. परंतु दलितोत्तर योजनेमधील कामे हे दलित वस्तीमध्येच करावे लागतात. या नियमाला छेद देत नगर परिषद पातुर १०० टक्के हिंन्दु धर्मीय भागात बांधकाम का करत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी सन २०१४ मध्ये सुध्दा पातुर शहरातील धार्मीक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टिने तसेच जातीय दंगल घडविण्याच्या दृष्टिने याच जागेवर मुस्लीम शादीखाना बांधण्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर केला होता. त्यावेळी सुध्दा याच भागातील नागरीकांनी मोठे आंदोलन करून सदरहू मुस्लीम शादीखानाचे बांधकाम बंद करून मुस्लीम शादीखानाची जागा बदलली होती. मुस्लीम शादीखान्याच्या प्रकरणामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तात्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांनी या जागेवर नगर परिषदने कोणतेही बांधकाम करू नये असे आदेश पारित केला होता. तसेच या आदेशाची प्रत पातुर नगर परिषद, पोलीस स्टेशन पातुर वि. तहसिलदार साहेब पातुर यांना सुध्दा दिलेली होती. त्या आधारावर
पोलीस स्टेशन पातुर यांनी सदरहु जागा हि वादग्रस्त असून या जागेवर भविष्यात कोणतेही बांधकाम झाल्यास समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होवुन पातुर शहरातील जातीय सलोखा बिषडु शकतो असा अहवाल तात्कालीन जिल्हाधिकारी अकोला तसेच पोलीस अधिकारी अकोला यांना तात्काळ पाठविला होता. तसेच पातुर शहरामध्ये घडलेल्या कावड दंगलामध्ये न.प. पातुरच्या राजकारणाचा पाश्वभुमीवर या जागी मुस्लीम शादीखाना हि बाब सुध्दा केंद्र स्थानी असल्याचा गोपनीय शाखेने शासकीय स्तरावर अहवाल दिला होता.
सदरहु न.प. पातुर प्रशासनाने बांधकाम केल्यास पातुर शहरातील धार्मीक वातावरण व कायदा व सुव्यस्थेचे भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि जागा आजरोजी ज्या परिस्थीतीत आहे त्याच परिस्थीतीत ठेवावी, सदर जागेवर न.प. प्रशासनाने कोणतेही बांधकाम अथवा कोणतीही कार्यवाही करू नये, जेणेकरून पातुर येथील वार्ड क्रं. ९, १०, ११ मधील समस्त नागरीकांना त्रास सहन करावा लागणार नाही.
म्हणून या तकार री द्वारे न.प. पातुर प्रशासनाने सदरहु जागेवरील आवार भिंतीचे बांधकाम स्त्वरीत थांबविण्यात यावे, अन्यथा सदर जागेवरील बांधकामाविरूध्द उग्र आंदोलन करावे लागणार व त्यापासुन उद्भवणान्या सर्व परिणामाची जबाबदार हि प्रशासनाची राहील असे या वेळी नागरिकांनी बोलून दाखवले आहे
या वेळी तक्रार करताना शामराव गाडगे,सचिन बारोकार(भाजयुमो शहर अध्यक्ष),सागर कढोने(ग्रामपंचायत सदस्य),प्रवीण इंगळे, गजानन गाडगे(छत्रपती प्रतिष्ठान),महेश काळपांडे,रमेश काळपांडे,गोविंदा पाटील,राजू मानमोडे,विलास वाहोकार,किशोर पोपळघट,वसंता वानखडे,सचिन बॉंबटकार, रंजना इंगळे,कुसुम इंगळे,उर्मिला वालोकार,रजनी कढोने,सविता बारोकार ,मेघा काळपांडे (माजी नगरसेविका) ,कल्पना इंगळे,ज्योती वालोकार ,हरिष इनामदार,ऍड दिनेश काळपांडे,सचिन पोपळघट ,नंदन काळपांडे, व असंख्य नागरिक उपस्थित होते.


