विद्यार्थ्यांचे केले थाटात स्वागत
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत एनसीसीच्या कॅडेट्सचं पथसंचलन करून केले आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी सेल्फी बस चे पोस्टर तयार करून विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण विद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यामध्ये प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत सर उपप्राचार्य एस बी चव्हाण उपमुख्याध्यापक आरएस ढेंगे पर्यवेक्षक एम बी परमाळे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.