विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा भाऊ मोहोळ व कार्यकर्त्यांचा तर्फे केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात रेल रोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये अग्नीपथ योजनेचा विरोध सुरु आहे. फक्त चार वर्षासाठी सैन्यात भरती करून घेणारे सरकार व चार वर्ष जवानांचे तरुणपण वाया घालवून देशाची सेवा करा नंतर म्हातारपणी त्यात जवानांचे काय हाल होणार आहेत हे सरकारला माहीत नाही. या सरकारने देशाला विकून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि या देशाचे तरुण चार वर्षासाठी विकून टाकण्याचा कट हे सरकार करत आहे त्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अकोला येथे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा भाऊ मोहोळ, सागर भाऊ मोहोळ, व असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


