विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
पातुर नंदापुर : परिसरामध्ये दि,१९ जून रोजी ६ वाजता पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला पावसाची वाट बघत बसलेला शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागणार आहे. परंतु या पहिल्याच पावसात बस स्टैंड वर पाणी साचल्याने वाहनांची तारांबळ उडाली पहिल्याच पावसात मालाची गाडी चिखलामध्ये फस लि कोळंबि फाटा वर पुलाचे काम चालू असल्यामुळे नाला बंद झाल्यामुळे रस्त्यावर पुरा प्रमाणे पाणी थांबल्यामुळे वाहने थांबून होती त्यातच दोघे मोटरसायकल ने हिरपुर ला जात असताना नाल्याला जास्त प्रमाणात पाण्याचा स्त्रोत वाढल्यामुळे दोन इसम मंगेश भीमराव राठोड, सुरेश शंकर चव्हाण, रा. हिरापूर ता. मुर्तीजापुर येथील युवक मोटरसायकलने जात असता वाहून गेल्याची घटना घडली परंतु चंडिका माता आपत्कालीन पथक कुरणखेड यांनी मदत करून त्या दोन तरुणांचे प्राण वाचवले. परंतु त्यांची मोटरसायकल वाहून गेले. पहिलाच पाऊस दमदार आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. परंतु या पावसाने शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.