किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पातुर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन आज मंगळवारी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे मनसेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये मेरिट श्रेणीत तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या सायली गायकवाड, भाग्यश्री बिलबिले, प्राजक्ता लांडे, गायत्री गावंडे, राधिका वाकोडे, श्रद्धा बंड, तेजस करंगळे, वैष्णवी मानकर, श्रेया आखरे, चैतन्य सोनटक्के, गायत्री तायडे, अंजली गावंडे, तुषार असोलकर यावेळी मनसेचे पातूर तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत लोथे यांच्या हस्ते गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे पालक यांच्यासह सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचे तसेच साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पातूर शहर मनसे अध्यक्ष विलास धोंगडे, अतुल आसरे, गोटू चापाईतकर, आकाश वानखडे, किरण राऊत, आकाश गावंडे, महेश गावंडे, मयुर घोलप, अमोल खोडे, मुकेश किरतकार, गुलाबराव वानखडे, कैलास नीनाळे, सागर माहुलीकर, सागर सौंदळे, सागर पांडे, योगेश लोखंडे, युवराज धोंगडे यांच्यासह इतर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा यावेळेस समावेश होता.