मुंबई : कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊनचा फटका राज्यातील शाळांना बसला आहे. राज्यातील शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर उपस्थित होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र १५ जूनपासून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर केली असून, त्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे. सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सोमवार 13 जूनपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांना थेट 15 जून रोजी शाळांमध्ये बोलावण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 13 व 14 जून रोजी शाळेची स्वच्छता, सुशोभीकरण, कोरोनाबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत. विदर्भातील तापमानाचा आढावा घेतल्यानंतर २७ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.