विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते नितीन मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हाभर 1001 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षदिंडी चे आज दिनांक 16 जून 2022 रोजी पिंजर येथे आगमन झाले. यावेळी अकोला जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परिमल पाटील लहाने व तालुकाध्यक्ष सतीश पाटील गावंडे राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष किरण पाटील ठाकरे कार्यकर्त्यांनी वृक्षदिंडी चे भव्य स्वागत केले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रा.यु.काँग्रेस, विकी दांदळे तालुका अध्यक्ष रा.यु.काँग्रेस बाळापुर, व प.स.सदस्य जावेद भाई पिंजर शहराध्यक्ष मुकेश भाऊ इंगळे युवा अध्यक्ष गजानन भाऊ वानखडे ग्रामपंचायत सदस्य पिंटू पाटील ठाकरे पिंटू भैय्या जयस्वाल प्रसिद्धीप्रमुख महेश भाऊ घनगाव निलखन भाऊ रमेश आडे नंदू बापू देशमुख हरीश घेंगे उदय ठाकरे विकी लाखे धनराज जवके व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)