अकोला : आगामी मान्सुन पूर्वतयारीच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामिण क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. रस्त्याजवळील वाळलेली व जीर्ण झालेली झाडे वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडून मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.