अकोला : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 139 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. दोन व खाजगी शून्य) दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 02.
आरटीपीसीआर ‘दोन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते रेल ता.अकोट व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
सक्रिय रुग्ण ‘दोन’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65183(49171+15038+974)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.