बांधकामात मुरुमा ऐवजी मातीचा वापर जास्त होत असल्याची ओरड
विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : अकोला ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर बरेच दिवसाचे काम चालू आहे कित्येक दिवसापासून या हायवेचे काम बंद पडले होते आणि इतके कित्येक दिवसापासून काम सुरू आहे. परंतु काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे काटेपूर्णा नदीवरील पूल बांधकामात मुरुमा ऐवजी मातीचाच अतिप्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने व यामुळे काटेपूर्णा नदीला नेहमी येणारा मोठा पुरासमोर ही माती कशी टिकाव धरेल ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे पूर्ण गावाला एकप्रकारे धोखा होऊ शकतो म्हणून समस्त गावकरी भयग्रस्त होते शेवटी दि. ८ मे ला सकाळी १० वाजताच्या सुमारास गावकरी मोठ्या प्रमाणात या कामावर हजर झाले व प्रतक्ष्य कामाची पाहणी केली तसेच संबंधित कंपनीचे प्रतिनिधीला याठिकाणी बोलवून ही गावकऱ्यांची शंका व भीती त्यांना अवगत करून देण्यात आली. यावेंळी त्यांनी थातुरमातुर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले नाही. या एकंदरीत कामाची चौकशी करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना याबाबत कळविण्यात येणार असल्याचे याबाबत ठोस अशी कार्यवाही न झाल्यास याकरिता मोठे आंदोलन करण्यात येईल यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे, उपसरपंच आसिफ खान, प्रशांत ठाकरे, नितीन मोहोड, अमन महल्ले, सैयद शाहीद,तंटा मुक्ती अध्यक्ष, रणजित घोगरे, सुयोग देशमुख,श्रीराम बोळे, प्रशांत इंगळे,गजानन काम्बे, सैयद शारिक, सलिम मिर्जा सै मोहीन ईरशाद पटेल सै आमिन, सै जाविद ,किशोर गुप्ता,विरेंद्र देशमुख, योगेश चिकार, उमेश शर्मा, करीम खान आदींसह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून बोरगाव मंजू पोलिसाच्या तगडा बंदोबस्त होता











