अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध शाखेतील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या कारण शैक्षणिक सत्र बरेच उशीरा चालू झाले असून खूप ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने शिकवणी वर्ग झाले असून अद्यापपर्यंत शिकवणी वर्ग पूर्ण झाले नसून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी 2022 च्या परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्या व जे विद्यार्थी ऑनलाइन साठी इच्छुक नाही अशा विद्यार्थ्यांना पर्यायी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणीचे निवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे कुलसचिव डॉ.तुषार देशमुख ,परीक्षा विभागाचे साहाय्यक कुलसचिव नरवाडे सर ह्यांना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे, वाशिम विद्यार्थी प्रतिनिधी शुभम बाजड, अमरावती विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित काळे,पातूर विद्यार्थी प्रतिनिधी सुरेंद्र अवचार,गोपाल काकडे, अविश कडू आदींनी निवेदन दिले व सदर निर्णय तात्काळ घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला.