गडचिरोली जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
निविदा प्रक्रियेची तातडीने चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश.
सौ.निलिमा बंडमवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:-अहेरी नगर पंचायत कडुन सन 2022-23 या एक वर्षासाठी तब्बल 1 कोटी 43 लक्ष रुपयांची घनकचरा व्यवस्थापन निविदा नुकतीच काढण्यात आली. एका विशिष्ट एजन्सीला हे कंत्राट मिळावे या करिता निविदेच्या नियमांत अनेक बदल करण्यात आले असल्याचा आरोप करित अहेरी येथील भाजपा नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत गडचिरोली येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेत निविदा प्रक्रियेबद्दल सविस्तर चर्चा केली.तसेच त्यांना एक निवेदन देत नियमांना डावलून ही निविदा काढण्यात आल्याने ती निविदा तातडीने रद्द करून पारदर्शकपणे नव्याने निविदा प्रकाशित करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.भाजपा नगरसेवकांनी केलेल्या मागणीला जिल्हाधिकारी संजय मिना यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर विषय गंभीर असल्याने नगर पंचायतीच्या निविदा प्रक्रियेची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला गडचिरोली जिल्हाधिकारी दिले.ह्यावर भाजपा नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले.घनकचरा व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने ही निविदा प्रक्रिया न करता नगर पंचायत अहेरी मार्फत हे व्यवस्थापन केल्यास वर्षाला लाखो रुपयांची निधी वाचेल व त्यातुन सफाई कामगारांचे वेतन वाढविण्याची जोरदार मागणी आकडेवारी सहित अहेरी नगर पंचायतच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केली होती.जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना भाजपा नगरसेवक शालिनी पोहनेकर,अमोल गुडेल्लीवार,विकास उईके,मुकेश नामेवार,संतोष मद्दीवार,संजय पोहनेकर सह अहेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.