अहेरीच्या पोलीस निरिक्षकांना दिले निवेदन.
सौ.निलिमा बंडमवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:-गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्याच्या परीसरात गेल्या काही दिवसात क्रिकेटचा सट्टा बाजार जोरात सुरु असल्यामुळे येथिल युवक मोठ्या प्रमाणात सट्टा लावत असल्यामुळे यात युवा वर्ग बळी पडत आहे आणि पैशे गमवल्याने कौटंबिक कलह निर्माण होत असून याद्वारे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्काळ यावर पोलीस प्रशासन अंकूश लावतील व संबंधित सट्टा बाजार चालकावर कठोर कारवाई करावी.अशी मागणी करित दि.5 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडुन अहेरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या निवेदणात केली आहे.निवेदण देताना मनसचेे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर,मनसे नेता नागेश तोरेम,संदिप गुम्मलवार,वैभव त्रिनगरीवार व अमोल रामटेके आदी उपस्थीत होते.