न.प पातुर व्दारे स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : नगर परिषद कार्यालय,पातूर व साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु. मंडळ,पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर शहरात भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त व माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद (IEC) उपक्रमांतर्गत शहरातील सर्वांना माहिती होण्यासाठी विविध स्पर्धेचे व लोककला व पथनाट्यव्दारे लोकजागृती तसेच कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. दि.८ मार्च २०२२ ला नगर परिषद पातुर चा सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्त एक दिवसीय कार्यशाळा व विविध स्पर्धचे बक्षिसे वितरण व स्वच्छता महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती सोनाली यादव मॅडम होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यालय अधिक्षक क्षिप्रा लोणारे मॅडम व समुदाय संघटक शालीनीताई ठक व पाणी पुरवठा अभियंता महेश राठोड व कार्यशाळेचे मार्गदर्शक विशाल राखोंडे उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम थोर समाज सुधारक महिलांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत हे वृक्ष व प्रशिक्षण किट देऊन करण्यात आले त्यानंतर शहरातील नागरिकांन करिता विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये चित्रकला व भिंती चित्र स्पर्धा, रांगोळी व निबंध स्पर्धा, लघुगीत तसेच शॉर्ट फिल्म स्पर्धा, स्वच्छता सेल्फी फोटो काढा व पाठवा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे व माझी परसबाग फक्त महिलांसाठी अश्या विविध स्पर्धेचा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र तसेच प्रशिक्षण किट व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले व स्वच्छता महिला कर्मचारी व पदाधिकारी यांना सन्मानपत्र व देऊन गौरव केला नंतर उपस्थित महिलांना माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची माहिती होण्यासाठी सागर राखोंडे व संच यांनी लोककला व पथनाट्य कार्यक्रम सादर करण्यात केला त्यानंतर विशाल राखोंडे यांनी घरगुती ओला व सुख्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करुन परसबाग निर्माण करणे व टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे व कचरा हा लाख मोलाचा निर्धार करुया वर्गीकरणाचा या बाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित महिलांना व स्वच्छता कर्मचारी व पदाधिकारी यांना प्रशिक्षण किट मध्ये कापडी पिशवी, परसबागेचे बियाणे, पेन व नोटबुक, नास्ता पाॅकिट देऊन सर्व सहभाग्याना प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष सागर राखोंडे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता महेश राठोड यांनी केले तर आभार मंडळाचे सचिव पल्लवी मांडवगणे यांनी केले यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी व पदाधिकारी व स्वच्छतादुत व बचत गटाचे महिला व स्पर्धेक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रवंदना म्हणुन करण्यात आली.


