अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : कोरोना मुळे सलग दोन वर्षे लॉकडाऊन लागले होते त्यामूळे महाप्रसाद बंद होता.मात्र या वर्षी मारसुळ पासून अवघ्या तीन किलो मिटर अंतरावरील श्री संत जमाल बाबा यांचे संस्थान आहे अतीशय निसर्ग रम्य वातावरण व अतीशय घनदाट जंगलात सदरहु देवस्थान आहे. त्यामूळे येथे बारा महिने भक्तांची वर्दळ असते. आणि दरवर्षी येथे महाशिवरात्री च्या दुसऱ्या दिवशी येथे महाप्रसादचे आयोजन केले जात असते. महाप्रसादला यावेळेस हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.तसेच सदरहू देवस्थान अतीशय जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.तसेच येथे महाप्रसादच्या अगोदर आठवडा भर भरगच्च कार्यक्रमचे व श्रीमद् भागवत व अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात येते. भागवतचे वाचन ह भ प श्री बळीराम धनु राठोड (किन्हीराजा) महाराज हे करतात तर विनेकरी ह भ प प्रल्हाद आघाव महाराज व ह भ प धनराज मेटांगे हे करतात.तर यात्रेचे आयोजन श्री संत जमाल बाबा पंच मंडळी मारसुळ यांच्या वतीने व पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी करत असतात. तसेच या प्रसंगी प्रमुख उपस्थीत शिवाजी घुगे, अजिंक्य मेडशिकर हे होते व परिसरातील सर्व भक्त मंडळी व गांवकरी मंडळी यांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली होती. सर्वात महत्वाच म्हणजे यात्रा कमिटीने दिवस रात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला त्यामुळे परिसरातील नागरिका कडून त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.


