किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडेन पाॅवेल व लेडी बेडन पाॅवेल यांच्या जयंतीनिमित्त होलीक्रास स्कूल अकोला येथे मंगळवार रोजी संपन्न झालेल्या चिंतन दिनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन सहभागी होऊन स्काऊट आणि गाईड यांना खेळासाठी मदत केली.
नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिस्टर निता फर्नांडिस मुख्याध्यापिका होलीक्राॅस स्कुल अकोला, प्रमुख अतिथी डॉ सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला, प्राचार्य फादर म्यॅथु करीकल, माऊंट कारमेल स्कूल अकोला, जिल्हा संघटक गाईड सौ मनिषा तराळे, जिल्हा संघटक स्काऊट महेंद्र वसावे प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा संस्था, अकोला व होलीक्राॅस स्कुल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ वैशाली ठग, अकोला शिक्षणाधिकारी प्राथमीक व डॉ सुचिता पाटेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जयंती निमित्ताने चितन दिवस ‘सर्व धर्म प्रार्थनेने’ संपन्न झाला ’या कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथील स्काऊट पी जे राठोड (सहा. लिडर ट्रेनर )यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील शिवम बगाडे, ऋतिक राठोड, विश्वास घुगे ,सारिका ताजणे कोमल उगले शुभांगी राठोड आदि विद्यार्थ्यांनीआपला सहभाग नोंदविला आहे. तसेच , विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिग्नल टाॅवर , मंकी ब्रिज, आदर्श तंबु , यांच्या तयारीत आणि सहभागी स्काऊट आणि गाईड यांना खेळासाठी मदत होती.