किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तालुका विकास मंचाचे सक्रीय पदाधिकारी असलेले मंगेश भाऊ केनेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून आलेगांव येथील कु.रुचिका कापकार या सव्वा वर्ष वय असलेल्या चिमुकलीला मरणाच्या दारातून बाहेर काढण्याचे अनमोल कार्य केले आहे. आलेगाव येथे वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबातील कु.रूचीका कापकर ही चिमुकली अनावधानाने गरम पाण्याने भाजली होती. उपचारासाठी तिला अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तिच्या तब्बेतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती तसेच तिची परिस्थिती खुप खालावत चालली होती.अशा परिस्थितीत रक्षण देशमुख व सोमनाथ बोबडे या सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पातुर तालुका विकास मंचाचे पदाधिकारी असलेले आणी रूग्णसेवेचा वसा घेतलेल्या व असंख्य रूग्णांना जीवदान देणारे विवरा येथील मंगेश भाऊ केनेकर यांच्याशी संम्पर्क साधला व कु.रूचीका विषयी माहिती दिली त्यांनी ही क्षणाचा विलंब न करता आपल्या कार्यकुशलतेचा परिचय देत मुंबई येथील हिंदूजा हाॅस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर यांच्याशी चर्चा करून चिमुकलीला अकोल्याहून मुंबईत हलवले आणी मग सुरू झाला तिच्या जीवन मरणाचा सघर्षमय प्रवास प्रथम हिंदुजा हॉस्पीटल नंतर वाडीया हॉस्पीटल येथे न थांबता आशिया खंडातील सर्वात मोठया नॅशनल बॅन सेंटरला भरती करताच हॉस्पीटलची पूर्ण टिम रुचीकाला वाचवण्यासाठी सज्ज झाली. डॉक्टर यांनी चिमुकली खुप सिरीयस असून आम्ही फक्त प्रयत्न करतोय वाचवण्यासाठी अशी माहिती दिली.रूचीका वर अनेक शस्त्रक्रिया व अथक प्रयत्न करून तिला नवीन आयुष्य येथील डॉक्टरांनी प्रदान केले.रूचीकाला बरे करण्यासाठी अनेक मान्यवरांनी मदतीचा हात दिला त्यामध्ये प्रविण भाऊ भोटकर यांच्या विशेष सहकार्याने राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे,आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे नवी मुंबईचे नगरसेवक चौगुले व इतर मान्यवर लोकांनी रूचीकाचे नातेवाईक व तिच्या पालकांना खुप मदत केली. या सर्व प्रवासात मंगेश केनेकर यांचा सिंहाचा वाटा असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.विशेषता कापकर कुटुंबानी मंगेश केनेकर यांचे या जन्मात न फेडता येईल येवढे आभार व्यक्त केले आहे.











