शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधि
अकोट : अंजनगांव महामार्ग वरील दिवठाणा फाटा ते अकोला जहागीर रस्त्याचे काम मंजूर होऊन अनेक महिने झाली तरी पण कामाला सुरुवात न झाल्या ने या रस्त्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील गिट्टी संपूर्ण उखडली आहे या गावची बाजारपेठ अकोट असून दारोरोज शेकडो वाहने या रस्त्यावर धावतात शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाला निवेदन देऊन सात दिवसाचे आत कामाला सुरुवात न केल्यास उप विभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनात अमोल बदरखे. प्रफुल बादरखे .राहुल जायले. संजय गयधर . श्रीकांत भोरखडे.अमोल बोरोडे.सुनील दांगटे. रवि जायले.ऋषिकेश बंगाले .आशिष उकळकार. अक्षय दामदर .प्रशांत भोरखडे.यांनी दिले आहे.