विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : तालुक्यातील देवळी येथील सरपंच सौ वैशालीताई सदांशिव ह्या आपल्या गावासाठी गावातील सामाजिक क्षेत्रातील कोणतेही काम असो सदैव धडपडणाऱ्या सरपंच म्हणून ओळखल्या जातात. कोरोना काळामध्ये संपूर्ण गावामध्ये मास्क वाटणे, गावातील साफसफाई चे कार्य वैद्यकीय क्षेत्रातील गावाला मदत आणि आपल्या गावामध्ये कोरोना महामारी चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि त्या माध्यमातूनच ग्रा. पं. देवळीच्या सरपंच सौ. वैशालीताई विकास सदांशिव कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय अकोला खडकी येथे आयोजित भव्य समारंभात अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत देवळीच्या सरपंच सौ. वैशालीताई विकास सदांशिव यांना “कोरोना योध्दा पुरस्कार २०२२” ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात असंख्य लोक उपस्थित होते.


