किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित अशोका पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय पातूर येथे पशूधन पदविका प्रमाणपत्र वाटप करण्याचा प्रथम दिक्षांत समारंभाचे आयोजन शिवजयंती चे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चारीत्र्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सन २०२१-२०२२ या सत्रामधिल ऐकून ४३ विद्यार्थ्यी उतीर्ण झाले असून त्यांचे पदविका प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल खंडारे साहेब, प्राचार्य डॉ. प्रविन बोळे, प्रा. अशोक घुगे होते तर कार्यक्रमाचे आयोजन निखील उपर्वट, डॉ. रामदास शेगोकार, जितेंद्र तेलगोटे, सागर गावंडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखील उपर्वट यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर गावंडे यांनी केले.











