गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा – गाडेगाव रस्त्यातील शेतनाल्यावरील पुलाचे पुनर्निर्माण तातडीने करण्याचे निर्देश आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांना दिले.कडाक्याची थंडी असतानाही कल रात्री आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुलाची पाहणी केली. गेल्या दोन वर्ष्यापासून मंजुरात मिळुनही रखडलेल्या पुलाचे बांधकाम व्हावे या करीता गाडेगाव चे शेतकरी व ग्रामस्थ सत्यत्याने मागणी करीत होते.1980 मध्ये अकोला जिल्हा परिषदेने सिमेंट चे पाईप टाकून तात्पुरत्या पुलाची निर्मिती केली होती. दरवर्षी या नाल्यात पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतातील काडी कचरा ,काटेरी काट्या,व गाळ अडकून पडत होता . त्यामुळे पुलाच्या पाईप मधून पाणी निघून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. पुराचे पाणी अवरुद्ध झाल्यामुळे पुराचे पाणी शेतातील पिकांमध्ये पसरुन दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान दरवर्षी होत आहे . त्यामुळे पुलाच्या पुनर्निर्माण ची मागणी शेतकरी सत्यताने करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आग्रही मागणी मुळे आमदार प्रकाश भारसाकळे पुलाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे . यावेळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता ठाकरे , भाजप जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड ,सरपंच प्रमोद वाकोडे ,विजय बोर्डे ,गोकुळ हिंगणकार ,उत्तम नळकांडे अन्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.