विद्यार्थ्यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पातूरच्या वतीने दिनांक 11 फेब्रुवारीला कोविड -19 लसीकरण शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वसंतराव नाईक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-19 चा दुसरा डोस देण्यात आला.या शिबिरामध्ये विद्यालयातील एकूण 120 विद्यार्थ्यांनी कोविड-19 लसीकरणाचा लाभ घेतला .सदर लसीकरण शिबिर हे मा.तालुका आरोग्य अधिकारी पातूर डॉ विजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली , डॉ. चिराग रेवाळे वैद्यकीय अधिकारी पातुर, डॉ. डाखोरे प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण घेण्यात आले.तसेच हे लसीकरण शिबिर प्रत्यक्ष राबवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पातूरचे विकास जाधव ,नितीन जाधव कु. भारती सुरवाडे . यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य एस. एम .सौंदळे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शिबिराला प्रामुख्याने उपस्थित होते.


