मुंबई : विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्रात मुंबई येथील फ्लॅटची माहिती लपवल्याने त्यांना चांदुरबाजार येथील न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात न्यायालयाने लागलीच बच्चू कडू यांना जामीन देखील दिली आहे. राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते. हेच ते घर असून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती. मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो. हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला आणि एका प्रकरणात तो दिला होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणात चा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खरं तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी आता आम्हाला जामीन मिळाला असून वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.