मोर्शी : आगामी उन्हाळी हंगामात वरुड मोर्शी तालुक्यात पाण्याची टंचाई भासू नये, हे लक्षात घेऊन परिसराचे आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत जलजीवन अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देवेंद्र भुयार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीला जीवन प्राधिकरणाचे गवाणकर, अधीक्षक अभियंता सोळंके, पथबंधरे विभागाचे सावंत, मजीप्राचे वानखेडे आदी उपस्थित होते.