विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला,,,राज्य शासनाच्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेमधून अकोला सुटले. त्यामुळे शेतकऱ्यांना एका चांगल्या योजनेपासून वंचित रहावे लागले. या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात रोजगार हमी योजना मंत्री ना. संजयजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
राज्यशासनाने राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली अशी मातोश्री पाणंद रस्ते योजना लागू केली. मात्र अकोला जिल्हा या योजनेतून सुटलेला आहे. त्याबाबत विरोधी पक्षांनी राज्य सरकार विरोधात राजकारण सुरू केले. मात्र प्राप्त माहितीनुसार जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून या योजनेत अकोल्यातील पाणंद रस्त्यांचा समावेश करण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला नसल्याची माहिती चर्चेत आली होती. त्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी जिल्हा प्रशासनाला संपर्क केला असता जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे अहवाल पाठविल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे नेमका घोळ काय आहे, नेमकी चूक कोणाची आहे याची शहानिशा करून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणंद रस्ते योजनेचा लाभ मिळावा व याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. संग्रामभैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, जिल्हा परिषद सभापती सम्राट डोंगरदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष परीमल लहाने यांनी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. संजयजी बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या प्रकाराबाबत माहिती दिली व या योजनेत अकोल्याचा समावेश करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई साठी निवेदन सादर केले.