सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
देऊळगाव माळी : 26 जानेवारी रोज बुधवार ला प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिन ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव येथे साजरा करण्यात आला.या दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत च्या वतीने शासकीय नियमानुसार ग्राम पंचायत समिती मधून पाच टक्के दिव्यांग खर्च करणे अंतर्गत केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील 15 दिव्यांग निराधार व्यक्तींना सहाय्य करण्याच्या उद्देशाने प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रकमेचा धनादेश पंचायत समिती मेहकर चे गटविकासअधिकारी आशिष पवार यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत चे सरपंच किशोर गाभने होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर पंचायत समितीचे अशोकराव मुळे( विस्तार अधिकारी कृषी )तसेच जगन्नाथ आरू.(विस्तार अधिकारी पंचायत) हे हजर होते.तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच रंगनाथ चाळगे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मगर, पोलीस पाटील गजानन चाळगे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन गाभने,शाळेचे केंद्रप्रमुख केशव काळे,मुख्याध्यापिका जगधने मॅडम, ग्रामपंचायतचे सदस्य स्वप्निल गाभणे, गजानन राजगुरू,सदस्य किरण ताई गाभणे, सविताताई,सारिका ताई खरात,मायावती गवई, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,व मदतनीस तसेच मराठी प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व गावकरी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये खालील 15 दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले.यामध्ये कमल कापरे, चंद्रकला कचरू फुलझाडे, सुमित्रा त्रंबक गवई, सरुबाई पिराजी गवई,मुनीर खान पठाण, इंदिराबाई रामभाऊ गवई, रुक्मिणी भानुदास सुरूशे, सत्यभामा डिगंबर वराडे, माणसा बाई आजाद पठाण, कासाबाई उकंडा हनवते, सुमन रामभाऊ मगर,हरणाबाई किसन गवई, रत्ना विठ्ठल जेठे, इरफान दिलावर पठाण, मूरकिदा दौलत साबळे,या निराधार दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जी.एस. मस्के यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक अरुण बळी यांनी केले.