सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : जिल्ह्यातील वडसा कुरखेडा व आरमोरी तालुक्यातील परिसरातील पाच हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा चोवीस तास कृषी पंपाना विद्युत पुरवठा मिळाला पाहिजे या साठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टर ने आणि मिळेल त्या वाहनाने शेतकरी उपस्थित झाले.व महावितरण कंपनी गडचिरोलीकडे निघाले असता कुरुड फाट्यावर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात मोर्चा अडविला मग शेतकऱ्यांनी कुरुड फाट्यावर दोन तास चक्का जाम केला .व त्या नंतर मोर्चे करी पायदळ गडचिरोली च्या दिशेने निघाले त्या नंतर महावितरण चे अधिकारी कार्यकारी अभियंता डोंगरवार सह कुरखेडाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे व वडसा चे सारवे हे कोंढाला ते आरमोरी च्या मधात रोड वर थांबून दोन तास चर्चा केली.माञ कोणताही तोडगा निघाला नाही.या क्षणी कोढाळा येथे ही शेतकऱ्यांनी तीन तास चक्काजाम केला.त्यावेळी पोलीसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल,अविनाश गेडाम,नंदू चावला,विकास प्रधान,विजय पुस्तोडे याच्या सह शेकडो शेतकऱ्यांना अटक केली.महावितरण कंपणीवर निघालेला मोर्चा गडचिरोली येथे पहोचू नये.या करिता पोर्ला समोर खरफुंडी फाट्यावर बरिकेट्स लावून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.झालेल्या मोर्चा च्या मागणी ची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.व काही दिवसातच चोवीस तास विद्युत पुरवठा कृषी पंपाना ला मिळेल असे आश्वासन दिले.या मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल,उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,उपजिल्हा प्रमुख भरत जोशी,तालुका प्रमुख नंदू चावला,शहर प्रमुख विकास परधन, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे,सागर मने,भूषण सातव,शैलेश चितमलवार,नगरसेवक अशोक कांगली विजय पुस्तोडे,अनिल मिसार,अरुण राऊत,चिंटू नाकाडे,लांजेवार,तानाजी ठाकरे,आरमोरी विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.