विविध विषयावर झाली चर्चा
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.११:-युवासेनेची आढावा बैठक नुकतीच भद्रावती शहरात पार पडली असून त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.भारतीय युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांच्या निर्देशानुसार तथा युवा सेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम व युवा सेना जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख संजय काळे यांच्या नेतृत्वात येथील युवा सेनेची आढावा बैठक माजरी, भद्रावती व वरोरा येथे संपन्न झाली. या बैठकीत युवा सेनेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. येणाऱ्या वर्षातील कामकाजाचे नियोजन करण्यात आले. याशिवाय या बैठकीत विवध विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, सरचिटनिस मनीष जेठानी, युवा सेना उपजिल्हा प्रमुख आलोख रट्टे, रमेश मेश्राम, नगरसेवक नंदू पढाल, दिनेश यादव, महेश जिवतोडे, घनशाम आस्वले, उमेश काकडे, सचिव गौरव नागपुरे, सुरज डाखरे, प्रीतम देवतळे, कल्याण मंडल उपस्थित होते.या बैठकीचे आयोजन युवा सेना तालुका प्रमुख महेश जीवतोडे व सर्व युवासेना टीमनी केले.तसेच मोठ्या प्रमाणात युवा सैनिक उपस्थित होते