प्राचार्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार…
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर (दि.८ जानेवारी २०२२)- स्थानिक डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॅा.के.एस.खंडारे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेवुन महाविद्यालयासमोरील गाजर गवत, प्लॅस्टीक निर्मुलन, आणि परिसरातील स्वच्छता असे अभियान चं राबवल्या गेले.या अभियानात प्राचार्य स्वत: सहभागी झाले होते. हे विशेष केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीमे अंतर्गत महाविद्यालय परिसरात आणि महाविदयालयाच्या प्रवेशद्वारा जवळ पडलेले कागद, प्लास्टिक बाटल्या, पालापाचोळा एकत्र करून त्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात आले आणि त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहकार्य लाभले. यावेळी रा.से.यो. स्वयंसेवकांनी देखील शिक्षकांसोबत संपूर्ण परिसर स्वच्छ करून“स्वच्छतेच्या दारी आरोग्य वास करी”असा संदेश दिला.स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी, संपूर्ण समाजासाठी, गावासाठी तसेचं देशातील व जगातील सर्वांसाठी आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी सुध्दा स्वच्छतेचे पालन हे सर्वांनी केले पाहीजे. खरं तर स्वच्छता ही अनेक प्रकारची असु शकते जसे की, वैयक्तीक स्वच्छता, सामाजीक स्वच्छता,वैचारीक स्वच्छता इ. असे प्रतिपादन यावेळी प्राचार्य डॅा. के.एस.खंडारे यांनी केले.या अभियानात प्राचार्य डॅा किरण खंडारे, डॅा विनायक वसु, प्रा. हर्षद एकबोटे, प्रा दादाराव गायकवाड, प्रा अतुल विखे, डॅा रोनिल आहाळे, डॅा दिपाली घोगरे, प्रा अनिल देशमुख, प्रा राहुल माहुरे, यांच्यासह अनिल चव्हाण, चंद्रकांत अमानकर, अशोक पांडे, शाम ताले, राठोड, पाचपोर, पार्थ गोमासे,खरात वैभव ताले या सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.