अकोला, दि.१७- जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतीमधील ४०३ रिक्त पदाच्या पोट पोटनिवडणुक होत आहेत. तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.२०), मतदानाच्या दिवशी (दि.२१) व मतमोजणीच्या दिवशी (दि.२२) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.