किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील एनसीसी कॅडेट्स च्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला अंतर्गत स्थानिक तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील एन सी सी चे 50 कॅडेट्स यांची आरोग्य तपासणी सोबत सीबीसी आणि सिकल टेस्ट करण्यात आली. इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला येथील कर्नल सी पी बदला सर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक कॅटची आरोग्य तपासणी झालीच पाहिजे म्हणून स्थानिक शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली. शासकीय रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. चिराग रेवाळे, डॉ. कैलास डाखोरे, इंगोले मॅडम, गिरोलकर मॅडम, तायडे सिस्टर आणि सुरवाडे सिस्टर यांनी तपासणी केली. या कार्यक्रमाला मार्गदर्शन अंशुमनसिंह गहिलोत, उमाताई कांकटे आरोग्य सहायिका आणि एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांनी मार्गदर्शन केले.











