कोला,दि.9 – कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणू प्रजातीच्या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले होते. दरम्यान ओमिक्रॉन विषाणूमुळे बाधित रुग्ण आढळून न आल्यामुळे निर्गमित केलेल्या आदेश शुक्रवार दि. 10 डिसेंबरचे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहतील. तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करुन स्वतंत्र्य आदेश निर्गमित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.
आदेशाप्रमाणे अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागाकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश शुक्रवार दि. 10 डिसेंबरचे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इ. आयोजन करता येणार नाही.