गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा पंचायत समिती नुकत्याच पार पडलेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत मो. मुबीन गुरुजी यांची या पदावर वर्णी लागली त्यांच्या या निवडीबाबत घोडेगाववाशियांच्या मनाच्या शिरपेचात तुरा रोवला गेला, व त्याबद्दल घोडेगाव वशियांना खूप आनंद झाला त्याप्रित्यर्थ घोडेगाव येथील प्रतिष्टीत नागरिक प्रा. प्रदिप ढोले, सुभाष दामोदर मा. सरपंच , मुन्नाभाई मा. सरपंच यांनी गुरुजींच्या निवासस्थानी छोटेखानी सत्कार घेतला. सत्कारप्रसंगी प्रा. प्रदिप ढोले यांनी सत्कारमूर्तीला हार व पुष्पगुच्छ देऊन शाल व श्रीफळ दिले, यावेळी सत्कारमूर्तीचा सत्कार करतांना प्रा. प्रदिप ढोले यांनी आपल्या मनोगतात सांगितले, आपल्या गावचे जेष्ठ नागरिक मो. मुबीन गुरुजींना जो सन्मान मिळाला ज्यामुळे संपूर्ण अकोला जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक मिळाला या सर्व अभिमनास्पद बाबींमुळे गुरुजींचे स्वागत सत्कार करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. सत्काराला उत्तर देतांना गुरुजींनी सांगितले माझ्या सर्वस्वी परीने मी कुठलाही भेदभाव किंवा पक्षपातीपणा न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहील व संपूर्ण गावाचा विकास करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील. सत्कार प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रा. प्रदिप ढोले, मोईन खान तंटामुक्ती अध्यक्ष , रमेश अमृता दामोदर, सुभाष दामोदर मा. सरपंच , मुन्नाभाई मा. सरपंच.भिकाजीं दामोदर,राजेंद्र ना. ढोले, राजेंद्र भाकरे, झिनत खान, प्रा. विकास दामोदर, मो. मुजीब, रजाखान,लक्ष्मण दामोदर, सईदभाई, युनूस खान इ. नागरिकांची उपस्थिती होती.










