गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील जि. प. व पं स. च्या पोटनिवडणूक झाल्यावर दि. १८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत तेल्हारा पंचायत समिती निवडणुकीत एकूण दोन अर्ज दाखल झाले होते. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे मो. मोबीन, मो. सिद्दीक यांनी तर भाजपा कडून अनिता पवार यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये हात वर करून मतदान घेण्यात आले यात मो. मोबीन अनुमोदक शिवसेनेच्या माळेगाव यांना ११ मते तर भाजपच्या अनिता पवार यांना केवळ ५ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या पाच मतांसाठी वरील स्तरावरील भाजपा व शिवसेना युती तुटलेली असताना या निवडणुकीत युती झाली तरी देखील 5 मतांच्या वर मजल मारू शकले नाही. मो. मोबीन यांचे अनुमोदक किशोर मुंदडा तर भाजपाच्या अनिता पवार यांचे सर्कलच्या सदस्या जयश्री लांडे होत्या. वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सैफुल्ला यांनी आपली जवाबदारी पार पाडली. यावेळेस वंचित महासचिव अशोक दारोकार, विकास पवार, मामणकर, पत्रकार आनंद बोदळे, सिद्धार्थ गवारगुरू, मो. मुजन्मील इ. कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी काम पहिले तर सदर निवडणूक प्रक्रियेत बी. डी. ओ. लिंबाजी बारगिरे तथा विस्तार अधिकारी उईके यांनी सहकार्य केले.गटनेता संजय हिवराळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा शिवाजी महाराजांना अभिवादन करून निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.