किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शहरातील नागरिकांना ठाणेदार हरिष गवळी यांचे आव्हान
पातूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्या करिता आव्हान केले आहे.अमरावती शहरात घडलेल्या दुदैवी घटनेची पुनरावृत्ती पातूर शहरात व पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत कुठेही होणार नाही याकरिता सर्व राजकीय तसेच पत्रकार व शांतता कमिटी सदस्य यांना पातूर पोलीस स्टेशन मध्ये आमंत्रित करून शहरातील समस्यां विषयी तसेच शहरातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना आव्हान केले आहे जेणेकरून कुठलेही अनुचित प्रकार तसेच चोरीचे प्रकार थांबवणे व मुख्य आरोपींना शोधणे सहज शक्य होईल.
शहरात घडणाऱ्या अनुचित प्रकारांना रोखण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना कराव्यात त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनी आपापले विचार व्यक्त केले. बैठकीत पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीष गवळी,उपनिरीक्षक हर्षल साहेब,जिल्हा उपाध्यक्ष भाजपा विजयसिंह गहीलोत ,न.प सदस्य राजु उगले, कांग्रेस तालुका सरचिटणीस मुख्तार सर,पातुर तालुका विकास मंचाचे किरण कुमार निमकंडे,शहर अध्यक्ष भाजपा अभिजीत गहिलोत,युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन बारोकार, शिवसेनेचे कैलास बगाडे,सामाजिक कार्यकर्ते जाहिद खान जेष्ठ पत्रकार राजाराम देवकर,देवानंद गहिले,प्रदीप काळपांडे,दुलेखा,निशांत गवई, साजिद खान,स्वप्निल सुरवाडे ,निखिल इंगळे,अविनाश पोहरे यांची उपस्थिती होती.