महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.६:-तालुक्यातील चंदनखेडा येथील माजी सरपंच व समाज परिवर्तक विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरांगना मुक्ताई क्रीडा मंडळ चरुर (ना.) व प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा यांच्या सहकार्याने दि.६ नोव्हेंबर रोजी किसान भवन चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही दिवसात रक्ताची मागणी वाढली आहे.त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या घटल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.जिल्हातील सामाजिक संस्था , शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे. यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल.असे आवाहन डॉ.अनंत हजारे जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे . त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चंदनखेडा येथील बिरसा मुंडा आदिवासी पुरूष बचत गट व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ नोव्हेंबर २०२१ शनिवार ला श्री.विठ्ठलजी रामकृष्ण हनवते माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक यांच्या वाढदिवसानिमित्ताने विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरूर ( धा) व प्राथमिक आरोग्य केंद्र गावकरी चंदनखेडा यांच्या सहकार्याने किसान भवन चंदनखेडा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.तरी युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सहकार्य करावे. आयोजन बिरसा मुंडा आदिवासी पुरूष बचत गट यांनी केले आहे. रक्तदान करुन देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष सुरेश हनवते यांनी केले आहे.