आंतरराष्ट्रीय युवा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचा माजी विद्यार्थी पंकज पोहरे यांचा सत्कार…!
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पंकज पोहरे यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस. एम.सौंदळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पंकज पोहरे हे वसंतराव नाईक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून विद्यालयासाठी ही गौरवास्पद बाब आहे. पंकज पोहरे यांना बालपणापासूनच समाजसेवेची आवड होती तसेच समाजसेवेचे बरेचसे धडे त्यांनी या विद्यालयातुन गिरवीले त्यामुळे त्यांनी समाजसेवेचा वसा धरला व याची परिणीती म्हणून त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. पंकज पोहरे हे आपल्या द प्रोफेशनल करियर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहेत. या पुरस्काराचे श्रेय त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृदांना दिले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य एस.एम. सौंदळे,पी.जे.राठोड, ए.व्ही. सोनटक्के, प्रा.जे.डी. भारस्कर, प्रा.व्ही.आर.थोरात, प्रा.आर. एम. बचाटे, प्रा.एस.टी. गाडगे, प्रा.एस.बी. आठवले,जी. एन. राऊत, सी. ए. वाघ, सौ. आर.ए. जाधव, सौ. आर. एस.देशमुख,सौ. के.डी. लोखंडे, एस. एच. जाधव, एस. बी. पोहरे, बी.डी. राठोड, जे. के. खुळे, पी. एस. शेगोकार, डी.जे.राजनकर, व्ही.डी. राठोड,श्रीमती.बी.बी.आडे,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.