जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातूर
दि 25/10/2021
लातुर/महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे आजादी का अमृत महोत्सव 75 वर्षा निमित्ताने श्रीमती सुशिला देवी देशमुख महाविद्यालय लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती यामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय समाजकार्य विभाग लातूर यांना प्रथम क्रमांक पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेले विद्यार्थी रोहित स्वामी, गीता बंडगर, या दोन विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये जवळपास लातूर जिल्ह्यातील आठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सुशिला देवी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजय पाटील, व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन बोराडे जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक लातूर व प्राध्यापक, प्राध्यापिका, यांची कार्यक्रमास उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी चांगल्याप्रकारे कार्यक्रमास सहभाग नोंदवला महात्मा बसवेश्वर महाविद्यालय समाजकार्य विभाग लातूर या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक अंतर्गत सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपये देऊन प्राचार्य पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला