किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर :पातूर येथे न्यायालयीन परिसरात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कायदेविषयक शिबिर 2 ऑक्टोंबर पासून आजादीचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने सुरू करण्यात आलेला आहे
आज पातुर न्यायालयामधे कायदेविषयक शिबिरमध्ये न्यायाधीश श्री एम.बी.पठाण यांनी कायदा व न्याय सगळ्यांसाठी एकच आहे एक झोपडपट्टी राहणारा किंवा एका बंगल्यामध्ये राहणारा सगळ्यांसाठी समान आहे ते बोलताना पुढे म्हणाले की हे कायदेविषयक शिबिर सुरू आहे दररोजचे शिबिरामध्ये वेगळेवेगळे कायद्याच्या विषयावर माहिती देण्यात येत आहे लोकांनी याचे महत्त्व जाणून घ्यावे व दुसऱ्यांनाही सांगावे तसेच अधिवक्ते एडवोकेट जाधव यांनी मुलभुत अधिकार बद्दल माहिती दिली तर विधी स्वयंसेवक दुले खान युसूफ खान यांनी अपघात व त्याविषयीची खबरदारी आणि प्रतिबंध यावर मार्गदर्शन केले.अपघात झाला तर आपण फोटो न काढता जखमींना रुग्णालयात न्यावे असे मार्गदर्शन केले तसेच एडवोकेट राठोड यांनी जेष्ठ नागरिक पालन पोषण अधिनियम वर मार्गदर्शन केले.
आजचे कार्यक्रम मध्ये अध्यक्षस्थानी न्यायाधीश पठाण साहेब होते तसेच मंचावर अधिवक्ता जाधव,एडवोकेट राठोड विधी स्वयंसेवक दुलेखान युसुफ खान एडवोकेट काजी अमजा आली. एडवोकेट भारती देशमुख ॲड.महाले.ॲड. मोसिन ॲड रूपाली राऊत ॲड मुरुक. विधी स्वयंसेवक अतिश पवार उमाताई महल्ले गोकर्ण मोकडकर. वानखेडे तसेच पक्षकारांची उपस्थिती होती.