महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१९:-नुकत्याच जाहीर झालेल्या जेइई ऍडव्हान्स परीक्षेच्या निकालात भद्रावती ग्लोरिअस अकादमीचा विद्यार्थी दीक्षांत बबन आसुटकर हा अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून आय.आय. टी. साठी पात्र ठरला आहे.दीक्षांत चे वडील मजुरीचे काम करतात व आई गृहिणी आहे. दीक्षांत ने खूप गरीब परिस्थितीतुन अभ्यास करुन आय. आय.टी. ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तो आपल्या आई- वडीलांसोबत डोलारा येथे राहतो. त्याचे घर फक्त एका रूमचे असून सुद्धा त्याने परिस्थितीवर मात करून आय.आय.टी. च्या परीक्षेत 1774 वी रँक पटकाविली आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय ग्लोरिअस अकादमी भद्रावतीच्या शिक्षक, व्यवस्थापक आणि आपल्या आई वडिलांना दिले आहे. त्याने जेइइ मेन्स व जेइइ ऍडव्हान्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.