पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : दि.19 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 09:30 वाजता सरपंच अशोकरावजी दाबके यांनी अंधानेर गावच्या संपूर्णपणे विकास करण्यासाठी दिलेल्या विविध आश्वासना पैकी आज पर्यंत सिमेट कॉंक्रीट रोड अंडर ग्राउंड ड्रेनेज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संरक्षक भिंत बांधकाम सिमेंट कॉंक्रीट रस्ता भूमिगत ड्रेनेज लाईन चे काम पूर्ण केले व आज शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या सहकार्याने तेली समाज मंगल कार्यालय 7 लक्ष रुपये मुस्लिम समाजा साठी शादीखाना बांधकामासाठी 10 लक्ष रुपये व भावनीनगर व गोपाळवाडी येथील अंधानेर गावामध्ये शाळेत येण्या-जाण्यासाठी सर्व मुला मुलींना व नागरिकांना प्रचंड त्रास होत होता तो त्रास कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आज शिवना नदी वरील 20 लक्ष रुपयामध्ये पुलाच्या कामाचा शुभारंभ आज आमदार श्री उदयसिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अण्णासाहेब शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख राजू राठोड, शिवसेना विभाग प्रमुख सोपान पाटील गोलाईत ,झेडपी उप अभियंता चव्हाण ,शाखा अभियंता मंगरुळे, प्रमुख पाहुणे विजू पाटील बारगळ,अरविंद राठोड,लखन चव्हाण,अंकुश बाविस्कर,ग्राम विकास अधिकारी एम.डब्ल्यु.पगारे उपसरपंच रिजवानाबी रशीद शेख , कमलबाई दाबके,अश्विनीताई वाघ,माधवी करवंदे.कैलास मालकर,अहमद पठाण,संदीप गायकवाड,रशिद शेख, गोरख करवंदे,माजी सरपंच कैलास राऊत, शेख साहेब,उत्तमराव वाघ, शिवाजी पुणे,जयसिंग जाखड,सुरेश जाखड, सलमान शेख, फिरोज शेख,मुस्तकींम शेख,ग्रा.पंचायत कर्मचारी व अंधानेर येथील ग्रामस्थ बांधव हजर होते.