अकोला,दि.19(जिमाका)- कोविड-19 चा प्रार्दुभाव व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीचे पालन करुन जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे व बंदीस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन केन्द्र यांना निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन शुक्रवार दि. 22 ऑक्टोंबर पासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
अटी व शर्ती याप्रमाणे :
1. सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
2. नाक आणि तोंड दोन्ही झाकल्या जाईल अशा प्रकारच्या मास्काचा वापर पूर्णवेळ बंधनकारक राहील.
3. आतमध्ये व बाहेर प्रवेश करतांना तसेच इतर ठिकाणी स्वयंचलीत हॅन्ड सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध ठेवावी.
4. श्वसन शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. शिंकतांना किंवा खोकलतांना टीशू पेपर अथवा रुमाल या साधणांचा वापर करावा. तसेच टिशू पेपरची योग्य ती विल्हेवाट लावावी.
5. कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास हेल्पलाईन नंबर वर संपर्क करण्यात यावा.
6. परिसरामध्ये थुंकण्यास सक्त मनाई राहील.
7. संबंधीत ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी यांनी कोविड-19चे अनुषंगाने लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक राहील. तसेच दुसऱ्या डोसपासनू किमान 14 दिवस पूर्ण झालेले असावे.
8. गर्दी टाळण्यासाठी सामाजीक अंतरानुसार रांगाची व्यवस्था करण्यात यावी.
9. एका स्क्रीनवर तसेच मल्टिप्लेक्समधील विविध स्क्रीनवर सलग स्क्रिनिंग दरम्यान मध्यतरानंतर पुरेसा वेळ निश्चीत करण्यात यावा.
10. एकूण आसण क्षमतेच्या केवळ 50 टक्के बैठक व्यवस्था बंधनकारक राहील.
11. पार्कीग व परिसराबाहेर गर्दीचे व्यवस्थापन करण्यात यावे.
12. टिकीट, खाद्य, पेय पदार्थ ई. करिता ऑनलाईन बुकींग व ई-वॉलेट पध्दतीचा वापर करावा.
13. चित्रपटगृहाबाहेर खाद्य आणि शीतपेये यांना केवळ बाहेरच परवानगी राहील. चित्रपट गृहामध्ये खाद्य आणि पेय पदार्थांना परवानगी राहणार नाही.
14. खाद्य किंवा पेय पदार्थांच्या विक्री करिता जास्तीत जास्त काऊंटर ठेवण्यात यावे. केवळ पॅकींग केलेल्या पदार्थाना परवानगी राहील.
15. खाद्यपदार्थाचे स्टॉलवर सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील.
16. खाद्य व पेय पदार्थाचे कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची व्यवस्था व्यवस्थापक यांनी करावी.
17. सर्व परिसराचे दैनंदिन निर्जुतुकीकरण करण्यात यावे.
18. संबंधीत ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा.
19. खाद्यपदार्थ विक्री करणारे कर्मचारी, सहायक कर्मचारी यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. तसेच दुसऱ्या डोस पासून किमान 14 दिवस पूर्ण झालेले असावे.
20. वाताणूकूलिक यंत्राचे तापमान 24-30 डीग्री सेन्टीग्रेड पर्यंत असावे.
21. कोविडच्या सबंधाने बदनामी किंवा असभ्य वर्तन होणार नाही ही बाब व्यवस्थापक आणि स्थानिक अधिकारी यांनी समन्वयाने हाताळली पाहीजे.
22. खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना क्यु आर कोडचा वापर करण्यास प्रोत्साहीत करावे.
23. सुरु करण्यात आलेल्या मनोरंजनाचे कार्यक्रमांचे परिचालन, कोविड-19संदर्भातील केन्द्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही अशा पध्दतीने करणे आवश्यक आहे.
24. निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांविरुध्द नियमानुसार संबंधीत प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्यात येईल.
25.कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंधकरण्यासाठी शासनाने तसेच या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना लागू राहतील.
26. कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निदेश तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन इत्यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्वे यांचे सर्व कार्यामध्ये व व्यवहारामध्ये कोटेकोरपणे पालन करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.