दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम शिर्ला येथे एका अल्पवयीन मुलीची दोन जणांनी खेड काढण्यावरून विनयभंगाचा गुन्हा पातूर पोलिसांनी दाखल करीत यातील दोनही संशयित आरोपी ना पातूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे
सदर घटना येथे 9 ऑक्टोंबर रोजी खाली होती या घटनेची तक्रार पीडित युवतीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली होती 17 ऑक्टोंबर रोजी ही तक्रार पातूर पोलिसांनी दाखल केली होती यामध्ये अपराध नंबर 555 /21 कलम 354 ,354 ड 341,506, 509 ,34 भा द वि 3,8 ,11 ,12 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता
यातील त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती ती माझी मुलगी शाळेमध्ये रस्त्याने जात असताना एकाने आय लव यु म्हणून दुसऱ्याने हात पकडून छेडखानी केली त्यामुळे ही मुलगी धास्तावले असून शाळेमध्ये जायला तयार नव्हती वडिलांनी विचारले तू शाळेत का जात नाही तर या मुलीने रस्त्यावर झालेल्या छेडखानी ची माहिती दिली व यातील आरोपी त्यांनी कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती मात्र वडिलांनी विचारल्यावरून सदर मुलीने आपबिती हकीकत सांगितली त्यामुळे यामध्ये गुन्हा दाखल होता त्यामुळे यातील संशयित आरोपी अक्षय भिमराव उमाळे राहणार शिर्ला व मनीष गोपनारायण राहणार शिर्ला या दोघांना पातूर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली असून याप्रकरणी पुढील तपास पातुर चे ठाणेदार हरीष गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पातुर पोलिस स्टेशनचे पीएसआय हर्षल रत्नपारखी करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे यामध्ये अधिक चौकशी पातूर पोलिस करीत आहेत.