बुलडाणा : जिल्हा चालक पोलीस अंमलदार भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2019 व 5 ऑगस्ट 2021 मध्ये जाहीरात देण्यात आली होती. त्याप्रमाणे या पदासाठी 4 ऑक्टोंबर रोजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा बुलडाणा शहरातील 12 व चिखली शहरातील 7 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. बुलडाणा शहरात एकूण 172 खोल्यांमध्ये 4128 परीक्षार्थी, तर चिखली येथे 104 खोल्यांमध्ये 2494 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 19 परीक्षा केंद्रामध्ये 276 खोल्यांमधून 6622 परीक्षार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांचे मार्गदर्शनाखाली 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 2 पोलीस उपअधिक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 38 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, 531 पोलीस अंमलदार, 53 महिला पोलीस अंमलदार, 34 व्हिडीओ कॅमेरे व 7 वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षार्थी उमेदवार यांचे छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे. पारदर्शकता कायम राहील याची दक्षता घेतली जाईल. परीक्षार्थी उमेदवारांनी कोणत्याही आमीशाला बळी पडू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.
सदर परीक्षा संबधाने कोणीही लाचेची अथवा कोणत्याही प्रकारची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांच्या 7062242548 क्रमांकावर संपर्क करावा. परीक्षेसंबंधीत अधिक माहितीसाठी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्या 07262-242327, नियंत्रण कक्ष बुलडाणा 07262-242400, चिखली पोलीस स्टेशन 07264-264067, ॲपटेक कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर समीर सोनकुसरे यांच्या 9004794946 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक यांनी केले आहे.
ही आहेत परीक्षा केंद्र
बुलडाणा शहर : शारदा ज्ञानपीठ, प्रबोधन विद्यालय, शिवसाई ज्युनिअर कॉलेज, एडेड ज्युनिअर कॉलेज, उर्दू ज्युनिअर कॉलेज, भारत विद्यालय, सहकार विद्या मंदीर, जिजामाता महाविद्यालय, कँब्रीज इंग्लीश स्कूल, श्री संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज, राजीव गांधी सैनिकी शाळा, श्री शिवाजी विद्यालय. चिखली शहर : राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चांधई, राधाबाई खेडेकर विद्यालय, श्री. शिवाजी हायस्कूल, आदर्श विद्यालय दिनदयाल नगर, श्री. शिवाजी सायन्स अँड आर्ट कॉलेज, अनुराधा इंग्लीश मिडीयम स्कूल, आदर्श कॉन्वेट ज्ञानपीठ.
असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र
पोलीस भरती चालक – 2019 परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र, परीक्षेचे शहर, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख व वेळ https:// mhpolicebharti.cbtexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सेकेतस्थळाला भेट देवून संबंधित युनिटचे नाव निवडा व प्रोसीडवर क्लिक करावी. लॉगीन आयडीवर क्लिक करा आणि आपला युजर आयडी जन्माची तारिख व नोंदणीकृत ईमेल आयडी प्रविष्ठ करावी. प्रोसीडवर क्लिक आणि तुमचा युजर आयडी, पासवर्ड एंटर करा व लॉगीन वर क्लिक करा. त्यानंतर प्रिंट ऍडमिट कार्ड बटनावर क्लिक करावे.
*****










